हिंदुस्थानपासुन फाळणी होऊन बाहेर पडल्यानंतर सातत्याने नामुश्कीला तोंड द्यावे लागत आहे. हिंदुस्थानला शिकस्त देण्याचा प्रयत्न केला, मात्र जगासमोर आपलीच नाचक्की झाली. पण आता नाही, अल्ला ताला आपल्यावर खुश असून, Eिहदुस्थानचे तुकडे पाडण्यासाठी आपल्याला पवित्र असा जिहाद सुऊ करायचाय. हा जिहाद असा तसा नाही तर या जिहादचे नाव आहे हनिट्रॅप.. माझ्या पाकिस्तानच्या खुबसुरत आणि घातकी लेडी कमांडो तुमच्या खुबसुरतीचा हिंदुस्थानच्या अलाकमानवर तसेच हिंदुस्थानचे महत्वाचे अधिकारी, शास्त्रज्ञ, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांवर तुमच्या सैंदर्याची भूरळ घालुन हिंदुस्थानची नस ना नस माहीत कऊन घ्या. वेळ आल्यानंतर याच कमजोरीवर हल्ला करीत आपण हिंदुस्थानला धुळ चारणार. तर माझ्या ट्रेन कमांडो हिंदुस्थानमध्ये अनेक महिला उच्च पदस्थ अधिकारी आहेत, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहाद सुऊ करीत, त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याचे काम सुऊ करा. हे भडकाउ भाषण आहे पाकिस्तानच्या इस्लामबाद येथील आयएसआयच्या (इंटर सर्व्हीस इंटेलिजन्स) मुख्यालयातील. नेमकी याची माहिती ‘रॉ’ च्या हाती लागली आणि त्यांनी देशातील तपास यंत्रणांना सतर्क केले.
रॉ.च्या माहितीनंतर तपास यंत्रणांची सुत्रे हालताच महत्त्वाच्या अधिकारी, नेत्यांवर तसेच शास्त्रज्ञांवर तपास यंत्रणांनी मोर्चा वळविला. गोपनीय पद्धतीने भारतीय तपास यंत्रणा लक्ष ठेवून असतानाच देशाच्या डीआरडीओ संस्थेत काम करणारा शास्त्रज्ञ पाकिस्तानी ललनाच्या संपर्कात असल्याची धक्कादायक म]िहती समोर आली. डॉ. प्रदीप कुऊलकर असे या शस्त्रज्ञाचे नाव समोर आले. कारण एकेकाळी हा शास्त्रज्ञ अतिशय शिस्तप्रिय आणि देशभक्त असल्याची अनेक उदाहरणे आहेत. एवढेच नाही तर या शास्त्रज्ञाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध होता. त्याच्या अनेक ]िपढ्या संघाशी निगडीत होत्या. एवढ्या असताना देखील हा शास्त्रज्ञ देशद्रोही नेमका झाला कसा? हा प्रश्न अनेकांना पडला. तर त्यासाठी दोन वर्षे पाठीमागे जावे लागेल. कुऊलकर यांचे सोशल मीडियावर अनेक लेख आणि पोस्ट असत. नेमके याच पोस्ट आणि लेख वाचून आपण प्रभावित झाल्याचे मेसेज कुऊलकर यांना येण्यास सुऊवात झाली. हे सर्व मेसेज एका महिलेच्या सोशल मीडियाच्या खात्यावऊन येत होते. प्रथम दुर्लक्ष केल्यानंतर कुऊलकर यांची नस या महिलेच्या लक्षात आली आणि तीने शेवटचा बॉम्ब टाकला. तो म्हणजे मला भारत देशाबद्दल प्रेम वाटते. देशा संदर्भात अशाच प्रकारची पोस्ट आणि लेख पाठवित जा, हे सर्व लेख मी पाकिस्तानात अनेक हिंदु तसेच भारत देशाबद्दल प्रेम असणाऱ्यांना पाठवित जाईन. बस्स आपले कौतुक होत आहे, असे समजताच कुऊलकर यांनी प्रथम या मेसेजला उत्तर दिले. येथूनच सुऊ झाला तो हनिट्रॅपचा खेळ.
ऐकमेकांचे फोन नंबर घेतल्यानंतर हे कॉल कधी व्हिडीओ कॉलवर वळले तेच समजले नाही. तेही अश्लिल व्हिडीओ कॉल सुऊ झाल्यानंतर वासनेच्या भरात कुऊलकर यांनी अतिसंवेदनशील माहिती या ललनेला पुरविण्यास सुऊवात झाली. तर नेमका याचा संशय रॉ. ला आला. यावेळी त्यांनी तत्काळ डीआरडीओला कळविले. डीआरडीओच्या वरिष्ठांनी कुऊलकर यांचा लॅपटाप जप्त केला. यावेळी त्यांनी अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी ललनेला पुरविल्याचे समोर आले. डीआरडीओने तत्काळ कुऊलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाअंती राज्य एटीएसने त्यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक मा]िहती बाहेर आली असून, या माहितीच्या आधारे पाकिस्तानकडे संरक्षण विभागातील अनेक गुपीते गेली असल्याचे समोर आले आहे. यामुळे याची खबरदारी म्हणून तत्काळ संबंधीत विभागांना अनेक प्रोजेक्टमध्ये बदल करण्यास सांग़ितले. एवढेच नाही तर तपासाअंती कुऊलकर यांचे काही फोन हे हवाई दलातील जवान निखील शेंडे याच्या मोबाईलवऊन देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे निखिल शेंडे देखील तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत. आणखी किती अधिकारी पाकिस्तानी ललनेच्या हनिट्रॅपमध्ये अडकले आहेत हे लवकरच समोर येईल.
मात्र हे काही पहिल्यांदा झाले नाही. यापूर्वी देखील पाकिस्तानी आयएसआयने अशा प्रकारे हनिट्रॅपचा उपयोग केला आहे. केवळ पुऊषावरच नाही तर महिला अधिकाऱ्यावर देखील सुंदर पुऊषांच्या मदतीने हनिटॅप केला असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, माधुरी गुप्ता. पाकिस्तानी राजदुतालयात डिप्लोमॅट म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्या येथे बऱ्यापैकी रमल्या होत्या. माधुरी गुप्ता ही अतिशय हुशार अधिकारी होती. तिने यापूर्वी अनेक देशात डिप्लोमॅट म्हणून काम केले होते. उर्दु भाषेवर तिचे प्रभुत्व असल्याने, तिची पाकिस्तानात रवानगी करण्यात आली होती. सर्व काही व्यवस्थित सुऊ असतानाच अचानक अविवाहीत असलेल्या माधुरी गुप्ता यांच्या संपर्कात पाकिस्तानी तरूण आला. वयाने तरूण आणि उर्दु शायरीत तरबेज असलेल्या या तरूणाने आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या माधुरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. यावेळी माधुरी या तरूणाच्या प्रेमात एवढी वाहवत गेली की आपण देशाबरोबर देशद्रोह करीत असल्याचेदेखील समजले नाही. भावनेच्या भरात तिने अनेक संवेदनशील माहिती या तरूणाला देण्यास सुऊवात केली. मात्र याची भणक रॉला लागली. यावेळी माधुरी गुप्ता हिला देशात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर चौकशी सुऊ करीत निलंबित केले. तर काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. मात्र याप्रकारामुळे सतर्क झालेल्या रॉने नेमकी कोणती माहिती पाकिस्तानच्या हाती लागली आहे, याचे विश्लेषण करीत संबंधीत माहिती निऊपद्रवी कशी ठरेल याची खबरदारी घेतली.
मात्र अशा प्रकारची मोड्स अनेकदा पाकिस्तानने वापरली आहे. यापूर्वी देखील राजस्थानच्या जयपूरमधून एका भारतीय जवानाला अटक करण्यात आली होती. हा जवान दोन पाकिस्तानी तऊणींच्या जाळ्यात अडकला होता. या तऊणींच्या सांगण्यावऊन त्याने देशासोबत गद्दारी केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असून लष्कराने त्याला ताब्यात घेतले होते. पाकिस्तानने देशावर संकटे आणण्याचा कित्येकदा प्रयत्न केला. मात्र देशाने तो हाणून पाडला आहे. त्यातूनही काही अधिकारी क्षणीक सुखासाठी देशाबरोबर गद्दारी करीत आहेत. मात्र अशा अधिकाऱ्यांना माफी कदापी दिली जाऊ नये.
– अमोल राऊत








