वृत्तसंस्था / गुरूग्राम
येथे झालेल्या 15 वर्षांखालील वयोगटाच्या आयटीएफ महिलांच्या विश्व मानांकन टेनिस स्पर्धेत झील देसाईने एकेरीचे तर श्रेया शिवानी आणि प्रांजल येडापल्ली यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेमध्ये भारतीय महिला टेनिसपटूंची कामगिरी दर्जेदार झाली असून त्यांनी चार अजिंक्यपदे मिळविली. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात झील देसाईने श्रुती अहलावतचा 2-6, 6-1, 6-4 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात श्रेया शिवानी आणि पांजल येडापल्ली यांनी माहीका खन्ना आणि सोहनी मोहांती यांचा 6-4, 6-0 असा फडशा पाडला. या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिका, रशिया, जपान, कोरिया, मलेशिया,सिंगापूरच्या टेनिसपटू सहभागी झाल्या होत्या.









