माळमारुती पोलिसांची कारवाई, पोलीस आयुक्तांकडून कौतुक : वाटमारी-घरफोड्यांची कबुली 13 -14
प्रतिनिधी/ बेळगाव
घरफोडी प्रकरणी एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली असून अटक करण्यात आलेले आरोपी न्यू गांधीनगर व उज्ज्वलनगर परिसरातील आहेत. फरहान रियाजअहमद दलायत (वय 22), रा. गुलाबशा गल्ली, न्यू गांधीनगर, जुबेरअहमद अब्दुलरशीद दलायत (वय 25) रा. आठवा क्रॉस, उज्ज्वलनगर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या जोडगोळीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. फरहानने गेल्यावर्षीही चोऱ्या, वाटमारी केल्या होत्या. गांजा सेवन प्रकरणीही त्याच्यावर कारवाई झाली होती. 2 जानेवारी रोजी संशयास्पदरीत्या फिरताना उज्ज्वलनगर परिसरात खबरदारीची उपाययोजना म्हणून माळमारुती पोलिसांनी त्याला अटक केली होती. तर जुबेरअहमदही सराईत गुन्हेगार असून 2021 मध्ये त्याने वाटमारी केल्या आहेत. कारवाई करणाऱ्या या पथकात एम. जी. कुरेर, सी. जे. चिन्नाप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लप्पन्नावर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, मल्लिकार्जुन गाडवी, महेश वडेयर व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद, फिंगरप्रिंट विभागातील विश्वनाथ मठपती, बाहुबली अलगाले, संतोष मणकापुरे, रुद्रय्या हिरेमठ व सोको अधिकारी हरिष यड्रावी आदींनी भाग घेतला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.









