सांगली :
कवठेपिरान (ता. मिरज) येथील सावंत गल्लीतील विनायक सुधाकर पाटील (वय 29) यांच्या घरातून 2 लाख 40 हजाराचे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
विनायक पाटील हे शेतकरी आहेत. सावंत गलीत त्यांचे घर आहे. त्यांनी सोन्याचे दागिने सुरक्षित म्हणून घरामध्ये असलेल्या लाफ्टच्या कपाटात भांड्याच्या पाठीमागे अडगळीतील पिशवीत ठेवले होते. दि. 2 नोव्हेंबर ते दि. 2 डिसेंबर या दरम्यान चोरट्याने अडगळीत ठेवलेले सोन्याच्या दागिन्याची पिशवी लंपास केली. दि. 2 रोजी हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. तसेच चौकशी केली. त्यानंतरही दागिने सापडले नाहीत. त्यामुळे सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.








