मुलीचा पराक्रम कळताच आईला बसला धक्का
सर्वसाधारणपणे घरांमध्ये जेव्हा किशोरवयीन मुलेमुली असतात तेव्हा त्यांना काही प्रमाणात पॉकेटमनी दिला जातो. हा पॉकेटमनी त्यांना स्वत:च्या गरजेच्या गोष्टी खरेदी करणे किंवा मित्रांसोबत खाण्यापिण्यासाठी खर्च करता येतो. अनेकदा काही मुलांना अधिक पैसे हवे असल्यास आणि त्यांना घरातून न मिळाल्यास ते चुकीचे कृत्य करत असतात. शेजारी देश चीनमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. तेथून समोर आलेल्या घटनेने लोकांना धक्का बसला आहे. चीनच्या एका शाळेत शिकणाऱ्या मुलीला स्वत:साठी काही ट्रेंडी दागिने हवे होते. यामुळे तिने स्वत:च्या आईचे मूल्यवान दागिने उचलले आणि बाजारात केवळ 700 रुपयांमध्ये विकून आली. आईला यासंबंधी कळताच तिला धक्काच बसला. 1दशलक्ष युआनचे दागिने तिने केवळ 60 युआनमध्ये विकले होते. सुदैवाने पोलिसांच्या मदतीने मुलीच्या आईला हे दागिने परत मिळाले आहेत.
कवडीमोल दरात विक्री
ही घटना चीनच्या शांघाय येथे घडली आहे. तेथील एका शाळेत शिकणाऱ्या मुलीने स्वत:च्या आईचे कोट्यावधींचे दागिने बाजारातील एका छोट्याशा स्टॉलवर विकले होते. या दागिन्यांची एकूण किंमत 1 कोटी 22 लाख 59 हजार 355 रुपये इतकी होती. मुलीला याची कल्पनाच नव्हती. तिला स्वत:साठी एक लिप स्टड आणि इयररिंग्स घ्यायची होती. या दोन्ही गोष्टी 60 युआन म्हणजेच 700 रुपयांमध्ये मिळतात. अशा सिथतीत मुलीने दागिने दुकानदाराला दिले आणि बदल्यात स्वत:च्या पसंतीची गोष्टी घेतल्या.
आईला बसला धक्का
मुलीच्या आईलाची याची माहिती कळताच तिने त्वरित पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सर्व्हिलान्स फुटेजद्वारे दुकानदाराची ओळख पटविली आणि त्याला फोन केला. त्याने ते संबंधित महिलेला दागिने परत केले आहेत. या या दागिन्यांमध्ये जेड ब्रेसलेट्स, नेटलेसेज आणि अनेक जेमस्टोनचे पीस होते.









