सातारा :
दौलतनगर (सातारा) येथील महिला वकिलांच्या बंगल्यातून अज्ञाताने पावणेपाच लाखांचे दागिने लंपास केले आहेत. पुनम चंद्रशेखर इनामदार (वय 66) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वकील पुनम इनामदार या चार दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. यामुळे घर बंद असल्याने अज्ञाताने त्यांच्या घरावर पाळत ठेवली. गुरूवार दि. 5 जून रोजीच्या मध्यरात्री दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील किचनच्या कट्याखाली स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याची अंगठी, कानातले, बांगड्या, हिऱ्याचे पदक, मंगळसूत्र, चेन, 9 अंगठ्या, 5 जोड कानातले, तीन चांदीच्या नोटा, ब्रेसलेट, टायटनची दोन घड्याळे, 200 रुपयांची नाणी, रोख रक्कम असा 4 लाख 77 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरी परत आल्यावर दरवाजा उघडा असून दागिने नसल्याचे लक्षात येताच पुनम इनामदार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
..








