खेड :
घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने तालुक्यातील धामणदेवी येथील घरडा हाऊसिंग वसाहतीतील सह्याद्री सदनिकेतून २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्या कंपनीच्या कामानिमित्त गुजरात- भरुच येथील सायखा-जीआयडीसी त गेल्या होत्या. चोरट्याने सदनिकेतील घराच्या दरवाजाचे लॅच कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटात ठेवलेले २ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ४० हजार रुपये किंमतीचे चांदीचे देव व इतर सोन्या-चांदीचा ऐवज अशा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. महिला घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे तिच्या निदर्शनास आले.








