प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावहून खानापूरला जाताना शास्रीनगर येथील एका महिलेचे 27 ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
शास्त्राrनगर येथील वंदना सचिन सोनवलकर (वय 52) या दि. 17 ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजी चौक परिसरातून खानापूरला गेल्या होत्या. याचवेळी त्यांचे 27 ग्रॅमचे मंगळसूत्र व पर्समधील दीड हजार रुपये अज्ञातांनी लांबवले आहेत. गेल्या शनिवारी घडलेल्या या घटनेची कॅम्प पोलिसात नोंद झाली आहे.
कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. बेळगावहून खानापूरला जाताना ही घटना घडली असून नेमकी चोरी कोठे झाली? याचा उलगडा झाला नाही. धर्मवीर संभाजी चौक परिसरातून या महिलेने बस प्रवासाला सुरुवात केली होती. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. झाडशहापूरजवळ ही घटना उघडकीस आल्याचे सांगण्यात येते.









