जयसिंगपूर, प्रतिनिधी
Kolhapur Crime News : येथील प्रसिद्ध शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल वय 70 व त्यांचा पुतण्या यश जैन यांचे अज्ञात पाच ते सहा इसमा नी जबरदस्तीने अपहरण केले.या घटनेने जयसिंगपूर शहर व परिसरात मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूरचे पीआय संदीप कोळेकर तसेच डी वा स पी रोहिणी सोळंके मोठा पोलीस पाऊस फाट्याने तपासाची यंत्रणा गतिमान केली होती.परंतु रात्री उशिरापर्यंत कोणताही सुगावा लागला नाही.
ही घटना संध्याकाळी नऊच्या दरम्यान गल्ली नंबर दोन येथील पोरवाल यांच्या घराच्या बोळ्यामध्ये घडली.संकेश्वर ज्वेलर्स चे मालक नवलमय पोरवाल व त्यांचा पुतण्या यश जैन हे आपले दुकान नऊच्या दरम्यान बंद करून गांधी चौकातून आपल्या जुपिटर या गाडीवरून घरी जात होते या वेळेला त्यांच्या घराजवळ असणाऱ्या गल्ली नंबर दोन येतील बोळ भागामध्ये असणाऱ्या अंधाराचा फायदा घेऊन मारुती व्हान मधील अगोदरच दाब धरून बसणाऱ्या पाच ते सहा युवकांनी त्यांची गाडी अडवली व त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत घालण्याचा प्रयत्न करीत होते.त्यावेळेला अपहरण करते व पोरवल यांच्यात झटापट ही झाली.तरीही त्यांनी पोरवाल व त्यांच्या पुतण्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत घालून बोळ रस्त्याने सरळ गल्ली नंबर दोन येथील पेंढारी यांच्या घरापासून नवीन तयार करण्यात आलेल्या डीपी रस्त्याने सुसाट वेगाने गाडी घेऊन गेली.तसेच पोरवाल व त्यांचा पुतण्याची जीपिटर गाडी ही घेऊन गेले.यावेळी ही झटापट सुरू असताना पोरवाल यांचे नातेवाईक ही काही अंतरावरती होते मात्र नेमके भांडण कोणाचे तरी सुरू आहे म्हणून ते पुढे आले नाहीत.तर काहीजण ही घटना पहात असताना कोणता तरी वाद सुरू आहे म्हणून दुर्लक्ष केले.
ही घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली जयसिंगपूर पोलीस स्टेशनला पोरवाल यांचे नातेवाई तसेच माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर व सरापोसिएशनचे युवराज शहा यांनी माहिती दिली हॅलो पोलिसांनीही तात्काळ शहरातून बाहेर जाणारे रस्ते बंद केले त्यानंतर त्यांच्या घराच्या परिसरातील तसेच गांधी चौक येथे असणारे शंकेश्वर ज्वेलर्स मधील ही सीसीटीव्हीचे कॅमेरे चेक करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी डिवाइस रोहिणी सोळुंके तसेच जयसिंगपूरचे पिया आहे संदीप कोळेकर यांनी भेट देऊन संपूर्ण माहिती घेऊन तपासाची दिशा ठरवली मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबतचे कोणतेच धागेद्वारे पोलिसांच्या हाती लागले नाहीत अपहरण नेमकं कोणत्या कारणासाठी झालं हेही समजू शकले नाही.