बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग सीजन 2 स्पर्धेत साईफार्म स्पोर्ट्स क्लब व जेवर गॅलरी डायमंड संघ विजयी झाले. जेवरगॅलरी डायमंड, मॅक्स आनंद अकादमा, साईफार्म स्पोर्ट्स क्लब, के आर शेट्टी किंग्स संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी पहिल्या सामन्यात साईफार्म स्पोर्ट्स क्लब संघाने साईराज वॉरियर्स पालेकर अकादमीचा 2 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साईराजने 9 गडी बाद 127 धावा करण्यात आला. अद्वैत भट 3 चौकारांसह 32 धावा, शाहरुख धारवाडकर 2 चौकारांसह 25, नीरज एम. 20, श्लोक चडीचाल 18 धावा केल्या.
साई फार्म स्पोर्ट्सतर्फे कौस्तुभ पाटील व निखिल राठोड यांनी प्रत्येकी 2 तर साईराज पोरवाल, सुप्रीत बुरुड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्मतर्फे 24.3 षटकात 130 धावा करुन हा सामना जिंकला. कौस्तुभ पाटील, 2 षटकार, 4 चौकारांसह नाबाद 60, साईराज पोरवाल व आरुष प्रत्येकी 15 धावांचे योगदान दिले. साईराजतर्फे श्लोक चडीचाल, गौरव परीट, शाहरुख धारवाडकर, व रितेश धामणेकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुण्या नंदिनी खांडेकर, मंजुळा कोटी, स्वाती कामकर, नागरत्न गणाचारी, यांच्या हस्ते सामनावीर कौस्तुभ पाटील व इम्पॅक्ट खेळाडू श्लोक चडिचाल यांना चषक देण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात जेवरगॅलरी डायमंड संघाने, के. आर. शेट्टी किंग्स संघाचा 5 गड्याने पराभव केला. के. आर. शेट्टी किंग्जतर्फे प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद करत 114 धावा केल्या. स्वयं खोत 4 चौकारांसह 31, सुजन एस, एफ. 2 चौकारसह 20, यश चौगुले 18 धावा केल्या. जेवर गॅलरीतर्फे विवान भूसद 2 तर मोहम्मद हमजा, सलमान धारवाडकर, अमार पठाण, यांनी प्रत्येकी एक गडी बाद. प्रत्युत्तरादाखल खेळताना जेवरगॅलरीने 20.1 षटकात 5 गडी बाद 118 धावा करीत सामना 5 गड्यांनी जिंकला. कृष्णा पाटील 7 चौकारांसह 44, सचिन तलवार 3 चौकार 26, विवान भूसद 2 चौकार 17 धावा केल्या. के आर शेट्टीतर्फे स्वयं खोतने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे रवी गोडी मिथिलेश मेंडके व्यंकटेश कुलकर्णी सिद्धाप्पा कुरबल यांच्या हस्ते सामनावीर कृष्णा पाटील इम्पॅक्ट खेळाडू स्वयं खोत यांना चषकदेवून गौरविण्यात आले. गुरुवारी सकाळी पहिला उपांत्य सामना साई फार्म स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मॅक्स आनंद अकादमी यांच्यात होणार आहे तर दुसरा उपांत्य सामना जेवर गॅलरी डायमंड व के आर शेट्टी किंग्स यांच्यात होणार आहे.









