वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरु असलेल्या 2025 च्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्य गोळफेकमध्ये जेसिका शिल्डरने शेवटच्या प्रयत्नात 20.29 मी. गोळाफेक करीत सुवर्णपदक पटकाविले. अमेरिकाच्या चेज जॅक्सनने 20.21 मी. गोळाफेक करीत रौप्यपदक तर न्यूझीलंडच्या मॅडिसनच्या-ली वेशे हिने 20.06 मी. गोळाफेक करीत कांस्य मिळविले. शिल्डरने वर्ल्ड चॅम्पियनशिप किंवा ऑलिम्पिकमध्ये मिळविलेले हे पहिले सुवर्ण आहे.









