वृत्तसंस्था / चार्लस्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या चार्लस्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या चौथ्या मानांकीत जेसिका पेगुलाने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना आपल्याच देशाच्या सोफीया केनीनचा पराभव केला.
1990 नंतर या स्पर्धेत पहिल्यांदाच यावेळी दोन अमेरिकन टेनिसपटूंमध्ये अंतिम सामना झाला होता. 31 वर्षीय पेगुलाने सोफीया केनीनचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या लढतीतील पहिल्याच सेटमध्ये पेगुलाने केनीनची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस तोडत आघाडी मिळविली. त्यानंतर हा सेट पेगुलाने 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये केनीनने कडवी लढत देत 5-1 अशी आघाडी पेगुलावर मिळविली होती. पण पेगुलाने त्यानंतर सलग 6 गेम्स जिंकून केनीनचे आव्हान संपुष्टात आणले. पेगुलाचे क्लेकोर्टवरील स्पर्धेतील हे पहिले जेतेपद आहे.









