वृत्तसंस्था / वुहान (चीन)
तिसऱ्या सेटमध्ये जेतेपदासाठी सर्व्हिस करताना जेसिका पेगुलाला दोनदा दुखापत झाली होती. परंतु बुधवारी टायब्रेकरमध्ये हेली बॅप्टिस्टवर मात करुन तिने वुहान ओपनमध्ये तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.
सहाव्या मानांकीत पेगुलाने तिच्या सातव्या मॅचपॉईंटवर तिच्या सहकारी अमेरिकन खेळाडूचा 6-4, 4-6, 7-6, (8-6) असा पराभव करुन तिसरी फेरी गाठली. गेल्या आठवड्यात चायना ओपन सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या पेगुलाचा पुढील सामना नवव्या मानांकीत एकटेरिना अलेक्झांड्रोवाशी होईल. जिने अमेरिकेच्या अँन लीचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव केला. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात पात्रता फेरीतील कॅटेरिना सिनियाकोवाने माया जॉइंटचा 6-3, 6-1 असा पराभव केला. साबालेंकाने वुहानमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 2018, 2019 आणि 2024 मध्ये जेतेपद जिंकताना तिचा विक्रम 17-0 असा आहे. मंगळवारी, या वर्षी यूएस ओपन आणि विम्बल्डन दोन्हीमध्ये उपविजेती राहिलेली चौथ्या क्रमांकाच्या अमांडा अॅनिसिमोवा हिने चायना ओपन जेतेपद जिंकल्यानंतर डाव्या पायाच्या स्नायुच्या दुखापतीचे कारण देत वुहान स्पर्धेतून माघार घेतली.









