वृत्तसंस्था/ अॅडलेड
एटीपी टूरवरील शनिवारी येथे झालेल्या अॅडलेड खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत झेकच्या जेरी लिचेकने एकेरीचे जेतेपद मिळवताना ब्रिटनच्या जॅक ड्रेपरचा पराभव केला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या लिचेकने जॅक ड्रेपरचा 4-6, 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील लिचेकचे हे पहिले जेतेपद आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत लिचेकने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.








