वृत्तसंस्था/ रियाद (सौदी अरेबिया)
भारताचा वेटलिफ्टर तसेच बर्मिंगहॅम राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पदकविजेता जेरेमी लालरिननुंगाला 4 ते 17 सप्टेंबर दरम्यान सोदी अरेबियात होणाऱ्या विश्व वेटलिफ्टींग स्पर्धेला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे.
भारतीय वेटलिफ्टींग फेडरेशनतर्फे घेण्यात आलेल्या चाचणी स्पर्धेत जेरेमी दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. सौदी अरेबियातील ही आगामी विश्व वेटलिफ्टींग स्पर्धा 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र फेरीची आहे. जेरेमीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 67 किलो गटात सुवर्णपदक मिळवले होते.









