वृत्तसंस्था / स्टुटगार्ट
डबल्युटीए टूरवरील येथे झालेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्टुटगार्ट खुल्या पोर्श्च टेनिस स्पर्धेत लॅटव्हियाच्या बिगर मानांकित येलेना ओस्टापेंकोने टॉपसिडेड साबालेंकाचा पराभव करत जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ओस्टापेंकोने साबालेंकाचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. चालु वर्षीच्या टेनिस हंगामातील ओस्टापेंकोचे क्लेकोर्ट स्पर्धेतील हे पहिले जेतेपद आहे. ओस्टापेंकोने 2017 साली फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतरचे क्लेकोर्टवरील ओस्टापेंकोचे हे पहिले जेतेपद आहे. स्टुटगार्ड स्पर्धेत साबालेंकाचा हा अंतिम फेरीतील चौथा पराभव आहे. 2021 ते 2023 या कालावधीत साबालेंकाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत 24 व्या मानांकीत ओस्टापेंकोने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंडच्या माजी टॉपसिडेड स्वायटेकला पराभवचा धक्का दिला होता.









