लॉस एंजिलिस :
अमेझॉनचे संस्थापक आणि दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्या जेफ बेजोस (60 वर्षे) हे प्रेयसी लॉरेन सांचेज (55 वर्षे) विवाह करणार आहेत. हा विवाह कोलोराडोच्या एस्पेनमध्ये 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्याकरता सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या विवाहासाठी केविन कॉस्टनरचा 160 एकरचा रेंच (व्हीआयपी फॅसिलिटी असलेला फॉर्म)ला व्हेन्यू म्हणून निवडले आहे. तर विवाहापूर्वीचा समारंभ पॉश सुशी रेस्टॉरंट मात्सुहिसामध्ये होणार आहे. बिल गेट्स, लियोनार्डो डिक्रॅपियो यासारखे अतिथी यात सामील होणार आहेत.









