बेळगाव : शिमोगा (कर्नाटक) येथे झालेल्या तिसऱया आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचा खेळाडू जीत शेखर जानवेकरने 6 ते 10 वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
सदर स्पर्धेत भारतासह श्रीलंका, नेपाल, अमेरिका, बांगलादेश, जपान या सहा देशातील सुमारे 2800 खेळाडू सहभागी झाले होते. 6 ते 10 वयोगटात कुमिटे व फाईटमध्ये जीत जाणवेकरने सुवर्ण तर कटाजमध्ये कांस्यपदक पटकावले. त्याला इंडियन कराटे क्लब बेळगाव आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र बी. काकतीकर व विनायक दंडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या कराटे स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे क्रीडामंत्री के. सी. नारायण गौडा आणि सुप्रसिद्ध अभिनेता सुमन तलवार, स्पर्धा सचिव डायरेक्टर फंडर अँड चीफ इन्स्पेक्टर वर्ल्ड कराटे यूएसएचे ग्रँडमास्टर पिरेर मौले उपस्थित होते.









