सरदार्स मैदानाच्या भिंतीचेही नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
मोटारसायकलला ठोकरून महिंद्रा जीप दुभाजकावर चढून सरदार्स हायस्कूल मैदानाच्या भिंतीवर आदळल्याची घटना शनिवारी घडली आहे. या अपघातात एक महिला जखमी झाली असून सुदैवाने कोणतीच प्राणहानी झाली नाही.
सावित्री डुकरे (वय 32) रा. कर्ले असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यासंबंधी शनिवारी रात्री वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता मोटारसायकलला ठोकरून जीप भिंतीवर आदळली आहे. मात्र, अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत मैदानाची संरक्षक भिंत कोसळली आहे.









