ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या JEE आणि NEET परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे.

JEE Main परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होईल. सप्टेंबरअखेर त्याचे निकाल हाती येतील.तर NEET परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. त्याचा निकाल ऑक्टोबरमध्ये लागणार आहे. मात्र, कोरोनाचे संकट गडद आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परीक्षेची तयारी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर JEE Main आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली होती. या दोन्ही परीक्षा यंदा वेळेतच होतील, असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.









