कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) (JDS) पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या (Kiccha Sudip) चित्रपटांवर, शो आणि जाहिराती प्रदर्शनावर आणि प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. किच्चा सुदिप यांच्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रभावित होऊ शकतात असा दावा जडीएसने केला .
काही दिवसापुर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप याने कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी (Karnataka Asembly Election) भारतीय जनता पक्षाचा ( BJP ) प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेला बोलताना सुदीप म्हणाला, “मला राजकारणात येण्याची कोणतीही गरज नाही आणि मी या व्यासपीठासाठी किंवा पैशासाठी आलो नसून मी सीएम मामा (मुख्यमंत्री बोम्मई) यांच्यासाठीच इथे आलो आहे. म्हणूनच मी बोम्मई सरांना माझा पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे.
दरम्यान, शिवमोग्गा येथील वकील के. पी. श्रीपाल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत सुपरस्टार कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपचे चित्रपट, शो आणि जाहिरातींच्या प्रदर्शनावर आणि प्रसारणावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. तसेच किच्चा सुदीपच्या निर्णयानंतर मला धक्का बसल्याचे सांगून दु:खही झाल्याचे सांगितले.