► प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची रविवार दि. 7 रोजी टिळकवाडी भागात पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील हे या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
महात्मा गांधी रोड येथील सिद्धिविनायक मंदिरापासून या पदयात्रेला सायंकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. महर्षी रोड, चौगुलेवाडी, द्वारकानगर, अयोध्यानगर, गोडसेवाडी या भागात पदयात्रा काढून त्यानंतर पदयात्रेचे सभेत रुपांतर होणार आहे. यावेळी जयंत पाटील हे मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदयात्रेमध्ये या भागातील युवक मंडळे, महिला मंडळे, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









