Jayant patil : लव्ह जिहाद मोर्चा असे मोर्चे निघतात हे माहीत नाही मला फक्त पुण्यात निघालेला महाविकास आघडीचा मोर्चा माहित आहे. तसेच शाईफेक प्रकरणात व्हिडीओ शूट करणाऱ्या पत्रकाराला दिवसभर तुरूंगात डांबून ठेवल्याची घटना देशात कधचित पहिल्यांदाच घडली असल्याचे मत राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते जयंत पाटील यांनी व्याक्त केले. ते आज सातारा दौर्यावर असून त्यांनी आज पत्रकारांषी संवाद साधला.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे आमच्या सरकारची संकल्पना आहे. तिच सध्याच्या सरकारने नव्याने सुरु केली आहे. लव्ह जिहाद मोर्चा यापुर्वी कधी निघाले नाही. असे मोर्चे निघतात हे याबाबत कोणतीही कल्पना नाही मला फक्त पुण्यात निघालेला महाविकास आघाडीचा मोर्चा माहित आहे” असे म्हणुन त्यांनी निलेश राणेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
पवार कुटुंबियावर होणाऱ्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले, “रोहित पवार काम अतिशय चांगल करतात त्यांच्या मतदार संघात त्यांचं काम उत्तम आहे. तसेच पवार साहेबाना धमकी कुठून आली याचाही शोध सध्याच्या सरकारने घेतला पाहिजे”
शाईफेक प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, “शाई फेक झाल्यावर ज्या पत्रकाराने व्हिडिओ घेतला त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. त्याला दिवसभर डांबून ठेवलं. महाराष्ट्रात आणि देशात हा प्रकार आवडलेला नाही म्हणून पत्रकारांनी सुधा आपल स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमच्या लढ्यात सहभागी व्हावं”
“कर्नाटक ची निवडणूक होत आहे. कर्नाटक च्या मुद्द्यावर दिल्लीला जायला उशीरपण केलाच आहे पण त्या आधी त्यांना जशास तसे उत्तर द्यायला हवे होते” असेही ते म्हणाले.
“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत राज्यपालांनी वापरलेली भाषा आणि इतर सगळे प्रकार सुरू आहेत त्या बद्दल आम्ही मोर्चा काढत आहोत. उदयनराजेंना माझा काही संपर्क नाहीये. आमचे मुद्दे योग्य वाटले तर कोणीही सहभागी होऊ शकत. सदावर्ते हे हस्तक आहेत त्यांना सत्तारूढ पार्टी चे अनेक जन त्यांचा वापर करतात आणि त्यांचा बोलवता धनी वेगळाच आहे” असेही ते म्हणले.
शेवटी त्यांनी “मंत्री मंडळ विस्ताराची जवळपास तयारी झाली असून ज्यांना मंत्री पद मिळणार नाहीत त्यांना आणखी एक भेट देऊन शांत बसवले जाईल. त्यामुळे मंत्री मंडळ विस्तार कधीही होऊ शकतो. तसेच अधिवेशन थोडक्यात गुंडाळून ठेऊ नये. किमान 3 आठवडे अधिवेशन चाललं पाहिजे. हे सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा भूमिकेत दिसत आहे.”असही ते म्हणाले.
Previous ArticleRatnagiri: लांजा तालुक्यातील केदारलिंग, गांगेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्या
Next Article Kolhapur : तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या









