ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधान परिषद निवडणूकीत दोन मतदानांवर कॉंग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. यावर निवडणूक अधिकारी कोणता निर्णय घेतील हे पाहावे लागणार आहे. एवढ्या लांब मतासाठी आलेल्या मतदारावर आरोप करणे हे दुर्देवी आहे अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. (Vidhan Parishad 2022 Election Jayant Patil News)
काॅंग्रेसने वेळकाढूपणा केला आहे असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, राज्यसभेच्या मतदानावेळी वेळकाढूपणा कोण केला होता. आक्षेप घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मतदाराला मतदान करता येत असताना दुसऱ्याने मतदान केले यावर जर काॅंग्रेसन जर आक्षेप घेतला यात गैर काही नाही. याबाबतीत निवडणूक अधिकारी योग्य तो निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
मात्र, भाजपाच्या (BJP) या दोन मतदारांना पुण्याहून यायला लावणं हे माझ्या दृष्टीने असंवेदनशील आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगतापांना (Laxman Jagtap) एवढ्या लांब आणणे अयोग्य आहे. काॅंग्रेसने नेमका काय आक्षेप घेतला याचा माझ्याकडे तपशील नाही. त्यामुळे यावर टीका- टिपण्णी करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.








