जितेंद्र आव्हाड यांची समजूत घालण्यासाठी आलो आहे. आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते. राष्ट्रवादीकडून जुना व्हिडिओ सादर करत विनयभंगाच्या कलमाचं माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांकडून (Jayant Patil) वाचन करण्य़ात आले.आव्हाडांनी विनयभंग केला नाही.त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्य़ात आलं आहे. मुख्यमंत्री स्वत:तिथे हजर होते.शिंदेंनीचं सांगावं, असं काही घडलं नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, हर हर महादेव चित्रपटात खोटा इतिहास दाखवण्यात आला आहे. सिनेमात शिवाजी महाराजांबाबत चुकीचं चित्रण दाखवण्यात आले आहे. चित्रपटाबाबत आव्हाडांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचं समर्थन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. राजन किणी यांच्या घरी तक्रारदार भगिणींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात पोलिसांचा गैरवाप सुरु आहे. पोलिस देखील एखाद्या पॅद्याप्रमाणे वागत आहेत. हे जर असचं सुरु राहिलं तर कायद्यावरील जनतेचा विश्वास उडेल. सरकारचा आणि पोलिसांनी केलेल्या या कृतीचा निषेध व्यक्त करतो असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









