Jayant patil News : जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच शरद पवार हे आमचे गुरु आहेत. पक्ष सत्तेत आणून पवारांना गुरुदक्षिणा दिल्याचे काल त्यांनी म्हटलयं. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. लवकरच जयंत पाटील यांनी पदभार सोडावा आणि तो तटकरे यांच्याकडे हॅंन्ड ओव्हर करावा असं सांगितलं. यानंतर जयंत पाटील काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आज मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे. शरद पवार जोपर्यंत जा म्हणत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी घेतली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पक्षात प्रवेश केला म्हणजे शरद पवार यांना गुरुदक्षिणा दिली हे म्हणणे केलेल्या कृतीचं समर्थन वेगवेगळ्या पध्दतीने करणं होयं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे सर्वाना माहित आहे. याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत असं कळतय. ज्यांच्यामुळे उध्दव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली.तीच कारण आमच्या समोर ठेवतायं.याबद्दल शिंदे गटात झालेली अस्वस्था लवकरच समोर येईल असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले.
शरद पवार आमच्या सोबत आहेत अस सांगून लोकांना सभ्रमात टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.काल साताऱ्यात पवार साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा शरद पवार करणार आहेत. पवारांचा दौरा लवकरच जाहीर करणार आहोत. हा झंझावात नाशिक जिल्ह्यापासून सुरु होईल असं वाटतयं. पवारसाहेबांवर विश्वास ठेवून जनतेनं मतदान केलं आहे. काल साताऱ्यात ज्या पध्दतीने स्वागत झालं. तसचं महाराष्ट्रातही त्यांच स्वागत होईल, असेही ते म्हणाले.
प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याला मी कोणतेही उत्तर देणार नाही. शरद पवार यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे.शरद पवार जोपर्यंत जा म्हणत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटणार नाही. प्रलोभनं दाखवून आमदार नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पक्ष आमचा आहे 53 आमदार आमच्याकडे आहेत. त्यातील 9 लोकांवर आम्ही कारवाई केल्याचेही ते म्हणाले.








