Jayant Patil ED Notice : संपूर्ण राज्याचं लक्ष महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुनावणीकडे लागंल असतानाच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज जयंत पाटील यांनी माध्यमांशी संपर्क साधताना यावेळी त्यांनी माझा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काल लग्नाचा वाढदिवस होता आणि ईडीकडून काल सायंकाळी 6 वाजता हवालदाराने नोटीस दिली. या नोटीसमध्ये स्पष्ट असं काही सांगितलं नाही.त्यातलं काही आयएल आणि एफएस प्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली आहे. माझा याच्याशी काहीही संबंध नाही.मी आयएल आणि एफएस यांच्याकडून कधी कर्ज घेतलेलं नाही. मात्र त्यांची नोटीस आलीयं तर त्याला सामोर जाणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, या चार दिवसात जवळच्या नातेवाईकांच्या घरी लग्न आहे. त्यामुळे चार दिवसांचा वेळ मागून घेणार आहे. याबाबत मी पत्र पाठवणार आहे. ईडीची नोटीस कशासाठी येते हे सगळ्यांना माहित आहे.त्यांना सोईची जी वेळ वाटते तेव्हा ते देतात.याला काही इलाज नाही. याला मी सामोरं जाणार आहे. माझ सगळं राजकीय आयुष्य खुली किताब आहे. घोट्याळ्याचा कार्यक्रम मी कधी केला नाही.त्यांना आवश्यक असणारी सगळी माहिती मी देणारचं.
आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले. जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








