Jayant Patil Tweet : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातले मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत, यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे झोड उठवले आहेत. हिवाळी आधिवेशनात देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरलं होतं. प्रकल्पावरून अनेक व्हिडिओ, फोटो, मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! असेही त्यांनी म्हटलंय. पोस्ट करत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी काय ट्विट केलं?
जयंत पाटील यांनी एका इमारतीवर तिन बॉनर असलेली इमेज ट्विट केली आहे. ज्यामध्ये प्रत्येक इमेजवर वेगळा मजकूर आहे. दूध मागोंगे दूध देंगे असं पहिल्या मजकूरामध्ये लिहिलं आहे.तर दुसऱ्यावर खीर मांगोंगे खीर देंगे असं लिहलं आहे. तर तिसऱ्या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे,तसेच इन्व्हेस्टमेंट मांगोगे,यूपी,गुजरात को देंगे, असं त्यावर लिहिलं आहे. याचबरोबर फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! अस कॅप्शन देत ट्विट केलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









