Elon Musk , Jayant Patil News: ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावे का? याबाबत तुमचे मत नोंदवा असे ट्विट केले. त्यांच्या या ट्विटवर जयंत पाटील यांनी थेट मस्क यांनाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटची आता राज्यभर चर्चा सुरू झालीय.
सध्या सीमावादावरून राज्यभरात गदारोळ सुरु आहे. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही,असे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात.एलन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.यात त्यांनी एलन मस्क यांना टॅग केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









