Jayant Patil News : पुण्याच्या पोटनिवडणुकी संदर्भात उमेदवार निश्चिती झाली नाही.पुणे लोकसभेबद्दल काँग्रेस, ठाकरे गटाशी चर्चा केल्यानंतर उमेदवार ठरणार असल्याचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांनाJayant Patil News : पुण्याच्या पोटनिवडणुकी संदर्भात उमेदवार निश्चिती झाली नाही.पुणे लोकसभेबद्दल काँग्रेस, ठाकरे गटाशी चर्चा केल्यानंतर उमेदवार ठरणार असल्याचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी अहिल्यादेवींचं नाव अहमदनगरला देणं चांगलंच आहे आहे अस म्हणत सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही पुन्हा मान्यता मिळवू.पुणे लोकसभेबद्दल काँग्रेस, ठाकरे गटाशी चर्चा करू असे ते म्हणाले. यावेळी अमोल कोल्हेंवर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. कोल्हे यांची संसदेतली भाषणं उत्तम झाली. त्यांची कामगिरी उत्तम असल्याचे ते म्हणाले.
एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळाली. आम्हाला एनडीएमध्ये घटकपक्षाचा दर्जा नव्हता. अस वक्तव्य कीर्तिकरांनी केलं होतं यावर जयंत पाटलांनी सारवासारव केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरला अहिल्यादेवींचं नाव देण्याचं जाहीर केलं.मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला त्यांनी समर्थन दिलं.
पंकजा मुंडे यांनी काल भाषणात मी भाजपची आहे.भाजप माझा नाही असं म्हटलं होत. यावरून पंकजा मुंडे यांची भाजप विरोधात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निष्ठावंतांना योग्य पद कसं द्यायचं ही भाजपची समस्या, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.