Jayant Patil : या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरेल. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे पवार साहेबच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असे, अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं तर मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटलांनी उत्तर दिले.राज्यात आगामी काळात होणारी निवडणूक आणि त्या अनुषंगाने विविध विषयांवर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कौतुक करताना ते म्हणाले की, माझी आणि राज ठाकरेंची फारशी ओळख नाही.मी त्यांना फक्त टीव्हीवर बघतो.पण त्यांनी माझी मिमिक्री चांगली केली होती.त्यांची भाषणंही चांगली असतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








