Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळाचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत कृष्णा नदीच्या दुषित पाण्याचा मुद्दा आज उपस्थित केला.सांगली शहरानजीक कृष्णा नदीत मळी मिश्रीत पाणी मिसळल्याने हजारो मासे मृत पावले आहेत.यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान जयंत पाटील यांनी हा मुद्दा मांडला.
जयंत पाटील सभागृहात म्हणाले की, स्वप्नपूर्ती डिस्टलरीचा पाईप फुटल्याने पाणी दूषित झाल्याचे प्रथमदर्शनी दिसले आहे. वसंतदादा शेतकरी साखर कारखाना दत्त इंडिया कंपनी या कंपनीला चालवण्यासाठी दिलेला आहे. मात्र डिस्टलरी त्यांच्याकडे दिलेली नाही अशी माहिती आहे. ही डिस्टलरी अधिकृत आहे का? नसल्यास त्याचा मालक कोण आहे? किती काळापासून ही डिस्टलरी सुरू आहे? या डिस्टीलरीच्या माध्यमातून कोणाला फायदा व्हायचा ? अशा प्रश्नांचा भडीमार जयंत पाटील यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








