वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे माजी सचिव तसेच आयसीसीचे विद्यमान चेअरमन जय शहा यांची मेरेलीबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
एमसीसीतर्फे ही घोषणा अधिकृतपणे शुक्रवारी करण्यात आली. गेल्यावर्षी झालेल्या एमसीसीच्या पहिल्या विश्व क्रिकेट फोरमच्या बैठकीला जय शहा उपस्थित नव्हते. या बैठकीवेळी लॉर्डस्वर किमान 100 कुशल क्रिकेट प्रशासक सदस्य उपस्थित होते. आता एमसीसीच्या नव्या विश्व क्रिकेट सल्लागार समितीमध्ये जय शहा हे सदस्य म्हणून कार्यरत राहतील. या समितीमध्ये 13 सदस्यांचा समावेश आहे. एमसीसीचे अध्यक्षपद लंकेच्या कुमार संगकाराकडे सोपविण्यात आले आहे. एमसीसीच्या या समितीमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली, द. आफ्रिकेचा ग्रीन स्मिथ, इंग्लंडचा अॅन्ड्रीव्ह स्ट्रॉस, इंग्लंड महिला संघाची कर्णधार हिथेर नाईट, जीओ स्टार्सचे सीईओ संजोग गुप्ता यांचा या समितीमध्ये समावेश आहे.









