सेवा बजावत असताना सिद्धाप्पा कोरे यांना हृदयविकाराचा धक्का
प्रतिनिधी/ सातारा
रहिमतपूरचे सुपूत्र व सध्या छत्तीसगडमध्ये सेवा बजावत असलेले एन.एस.जी. कमांडो सिध्दाप्पा आप्पासाहेब कोरे (वय 43) यांना सोमवारी पहाटे वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रहिमतपूरमध्ये शोककळा पसरली. शहरात श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले आहेत.
सिध्दाप्पा कोरे यांनी परिस्थितीशी दोन हात करत शिक्षण पूर्ण केले. 2007 साली ते भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले. 16 वर्षात त्यांनी देशभरात विविध ठिकाणी उत्कृष्टपणे सेवा बजावली. सध्या ते छत्तीसगड राज्यात एन.एस.जी. कमांडो म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रहिमतपूर शहरात शोककळा पसरली. जागोजागी श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले.
सैन्य दलाच्यावतीने मंगळवारी सकाळी रहिमतपूर येथे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








