किंमत 1.99 लाख : ड्यूअल चॅनल एबीएस, 5 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जावा येझेडडी मोटरसायकलने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय दुचाकी जावा 42 जावा 42 ‘जावा 42 एफजे350’ ची स्पोर्टी आवृत्ती सादर केली आहे. नवीन स्टाइल आणि पॉवरफुल इंजिनसह ही बाईक सादर करण्यात आली आहे. एलईडी हेडलॅम्प, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, असिस्टसह ड्युअल-चॅनल एबीएस आणि स्लिपर क्लच यांसारखी वैशिष्ट्यो या नवीन दुचाकीमध्ये देण्यात आली आहेत. याशिवाय रेट्रो दिसणाऱ्या बाइकच्या डिझाइनमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. या गाडीची सुरुवातीची किंमत 1.99 लाख असून 5 रंग आणि 6 प्रकार पर्यायात ती उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच हे नवीन मॉडेल 42 श्रेणीचा भाग आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 1,99,142 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. 5 रंग आणि 6 प्रकारांमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये अरोरा ग्रीन मॅट, मिस्टिक कॉपर, कॉस्मो ब्लू मॅट, डीप ब्लॅक मॅट रेड क्लॅड आणि डीप ब्लॅक मॅट ब्लॅक यांचा समावेश आहे. बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. तुम्ही जावाच्या अधिकृत वेबसाइटवरून 942 रुपये टोकन मनी देऊन गाडी बुक करू शकता. भारतीय बाजारपेठेत जावा 42 एफजे 350 ची स्पर्धा नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, रॉयल एनफिल्ड हंटर 350, हेंडा एच हे सीबी 350, होंडा सीबी 350 आरएस, होरा मॅवेरिस्क440 आणि टीव्हीएस रोनिन यांच्या सोबत होणार आहे.