प्रतिनिधी
बांदा
वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी ठेवणे, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन व नाट्य रसिकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस तसेच मानकरी, ग्रामस्थ व वाफोली हितवर्धक संस्था मुंबई यांनी केले आहे.
Previous Articleशाळेचे गेट अंगावर पडून विद्यार्थ्यांचा दुदैर्वी मृत्यू
Next Article बॉक्सिंग खेळातील उभरता तारा….. निखिल गावकर









