न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा भूमिका जत्रोत्सव शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी होणार असून या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम नवसफेड,केळी ठेवणे,भूमिका देवीची ओटी भरणे असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
त्यानंतर रात्री दहा वाजता पुराणकथा वाचन,सवाद्य आरती,मिरवणूक व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.तरी आजगाव दशक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन गावकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Previous Articleबेळगाव विमानतळाला राणी चन्नम्मांचे नाव देण्याचा विचार
Next Article आनंदनगरमध्ये चोरट्यांचा उच्छाद









