सावंतवाडी | प्रतिनिधी
कलंबिस्त येथील ग्रामदैवत श्री लिंगेश्वर देवस्थान मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव रविवार 31 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने सकाळी पूजाअर्चा ,सायंकाळी दर्शन ,रात्री पालखी मिरवणूक व आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी ,सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.









