विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /म्हापसा
श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट कळंगूट गोवाचा 59 वा महान जत्रोत्सव आज 11 ते 17 पर्यंत विविध कार्यक्रमानीशी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्त श्री देव बाबरेश्वर देवस्थान पुरोहित यशवंत केळकर यांच्या अधिपत्याखाली व यजमान श्री. व सौ. प्रगती सुरज मनोहर वायंगणकर खोब्रावाडा कळंगूट (उपसचिव श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट कळंगूट) यांच्यातर्फे सकाळी अभिषेक, लघुऊद्र, प्रतिष्ठापना, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद, सायं. 6 वा. तालचक्र निर्मित व यशवंत केळकर पुरस्कृत गायक कलाकार अक्षय नाईक, गायिका सौ. हर्षा सावंत, तबला-तुकाराम बिटये गोवेकर, हार्मोनियम- सुनाद कोरगावकर, मंजिरी- सागर पेडणेकर यांचा नाट्यागीत व भक्तीगीताचा बहारदार कार्यक्रम ‘स्वर संध्या’ होणार आहे. रात्री 9 वा. दशावतारी पौराणिक नाट्याप्रयोग ‘पुनर्जन्म’
रविवार दि. 12 रोजी सकाळी 10.30 वा. श्री. व सौ. सपना रघु(सागर) हळदणकर यांच्या यजमानपदाखाली सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद नंतर देवस्थान टर्सट व ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद, सायं. 5 वा. निलेश गोवेकर प्रस्तुत भजनी कलाकार मोहनदास पोळे, गणेश पार्सेकर, महाबळेश्वर च्यारी, हार्मोनियम: निलेश गोवेकर, तबला:- बाबाजी पेडणेकर आणि साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री 8 वा. केळ्याच्या घडांची पावणी, रात्री 9 वा. श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्ट कळंगूट आयोजित अखिल गोवा रेकॉर्ड डान्स स्पर्धा. स्पर्धा 15 वर्षांखालील व 15 वर्षावरील व्यक्तींसाठी दोन गटात घेतली जाईल.
15 वर्षाखालील व स्पर्धेचे प्रथम बक्षीस ऊ. 5000 आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय बक्षीस ऊ.3000 आणि स्मृतिचिन्ह, तृतीय बक्षीस ऊ. 1000 आणि स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ 2 बक्षिसे ऊ. 500 देण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांनी खजिनदार लक्ष्मण (उदय) शिरोडकर 9822389015 यांच्याशी संपर्क साधावा. प्रथम 15 आलेल्या व्यक्तीसाठी प्रवेश दिला जाईल.
सोमवार दि. 13 रोजी सकाळी 10.30 वा. यजमान श्री. व सौ. अनिता हर्षद कळंगुटकर (खोब्रावाडा कळंगूट) यांच्यातर्फे श्री सत्यनारायण महापूजा, आरती तीर्थप्रसाद, दुपारी यजमान व कुटुंबियांतर्फे महानैवेद्य, सायं. 5 वा. श्री. शांतादुर्गा जांभळेश्वर बाल भजनी मंडळ कळंगूटतर्फे भजनाचा कार्यक्रम, रात्रौ 8 वा. केळ्यांच्या घडांची पावणी, रात्रौ 9 वा. श्री. उल्हास दत्ताराम मयेकर पुरस्कृत, व सिद्धकला नृत्य संस्था सादर करतील सांस्कृतिक नृत्यांचा कार्यक्रम ‘मनोमय’ संचालिका-जानवी बोंद्रे. मंगळवार दि. 14 रोजी सकाळी सकाळी 10.30 वा. यजमान श्री. व सौ. स्वप्नाली सुनील वेंगुर्लेकर- प्रभुवाडा कळंग्गूटतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी यजमान व कुटुंबियांतर्फे महानैवेद्य, सायं. 5 वा. सावतावाडा ग्रामस्थांतर्फे भजन, रात्री 8 वा. केळ्यांच्या घडांची पावणी, रात्री 9 वा. दोन अंकी धमाल विनोदी नाटक ‘शुभ टिंगल सावधान’ पुरस्कृत : समीर चोडणकर, समीर गोवेकर, मनोज नाईक, दिनेश सिमेपुरूषकर, किशोर दिवकर, विकी दिवकर, प्रविण नागवेकर, जीतेंद्र सिमेपुऊषकर.
बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10.30 वा श्री. व सौ. मेघा मोहन रायकर उमतावाडा कळंगूटतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी उमताबाद्य बॉईजतर्फे महानैवेद्य, सायं. 5 वा. श्री जांभळेश्वर भजनी मंडळ गावरावाडातर्फे भजन, रात्रौ 8 वा. केळ्यांच्या घडांची पावणी, रात्रौ 9 वा. उमतावाडा बॉईज प्रस्तुत ऑर्केस्ट्रा. गुऊवार दि. 16 रोजी सकाळी 10.30 वा. यजमान श्री. व सौ. ग्रंथाली गजानन सिमेपुरूषकर खोब्रावाडा कळंगूटतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी हॉटेल एस्ट्रेला दो मार बाबरेश्वर टॅक्सी ड्रायव्हर संघटनातर्फे महानैवेद्य, सायं. 5 वा. श्री. समीर गोवेकर व साथींचा भजनाचा कार्यक्रम, रात्रौ 8 वा. केळ्यांच्या घडांची पावणी, रात्रौ 9 वा. ऑर्केस्ट्रा ँ़कार मेलोडीज’ पुरस्कर्ते यशवंत केळकर, (श्री देव बाबरेश्वर देवस्थान पुरोहित), कृष्णनाथ नानोडकर कळंगुटकर, लक्ष्मण (उदय) सा. शिरोडकर, यशवंत कांदोळकर, अमर नाईक, निलेश गोलतेकर, पारेख शिरोडकर, राजेश वाडजी, प्रसाद शिरोडकर, चंद्रकांत (चानू) चोडणकर, प्रभाकर सिमेपुऊषकर, सुरज वायंगणकर.
शुक्रवार दि. 17 रोजी सकाळी 10.30 वा. यजमान श्री व सौ. ज्योती गोकुळदास साळगावकर प्रभुवाडा- कळंगूटतर्फे श्री सत्यनारायण महापूजा आरती, तीर्थप्रसाद, दुपारी यजमान व कुटुंबियांतर्फे महानैवेद्य, सायं. 5 वा. श्री शांतादुर्गा कलासंघम सांस्कृतिक संस्था खोब्रावाडा-कळंगूटतर्फे भजनाचा कार्यक्रम, रात्रौ 8 वा. केळ्यांच्या घडांची पावणी, 9 वा. देणगी कुपन निकाल (लकी कुपन ड्रॉ), रात्री 10 वा. ऑर्केस्ट्रा स्टार मेलोडीज’ पुरस्कर्ते रोलींग स्पोर्ट्स क्लब, खोब्र्राबाडा, कळंगूट. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव बाबरेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.









