जत, प्रतिनिधी
जत तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने दुष्काळी सवलती देऊन, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करावे. तसेच पूर्व भागातील वंचित गावांसाठी कर्नाटक राज्याकडे असणारे शिल्लक पाणी तुबची योजनेतून सोडण्याची मागणी आ. विक्रम सावंत यांनी केली आहे.
मुंबई येथे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आ. सावंत यांनी जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कडे सभागृहाचे लक्ष वेधले. आ. सावंत म्हणाले, यंदाच्या टंचाई व नैसर्गिक आपत्तीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जत हा कायमचा दुष्काळी व आवर्षण प्रवण क्षेत्रात मोडणारा तालुका आहे. या भागात दरवर्षी मान्सून पूर्व पाऊस होतो, परंतु यंदा कसलाच पाऊस झाला नाही. शिवाय पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी पावसाचा पत्ता नाही. यामुळे गंभीर संकट ओढवले आहे. खरीप हंगाम वाया गेला असून, ज्या काही चार ते पाच टक्के पेरण्या झाल्या त्या देखील करपून गेल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले आहे.
तसेच जनावरांना चारा नाही. पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होत आहे. यासाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरु करून दिलासा देण्याची गरज आहे. जत पूर्व भागातील पूर्णतः सिंचना अभावी वंचित असणाऱ्या गावासाठी कर्नाटकच्या तुबची योजनेतून पाणी देणे श्यक्य आहे. महाराष्ट्राचे सात टी एम सी पाणी त्यांच्याकडे शिल्लक असून हे पाणी सोडण्याचे निर्देश व्हावेत, अशी विनंती त्यांनी तालिका पिठासन सभापतीकडे केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








