वृत्तसंस्था/ हॅले (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या खुल्या हॅले ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत इटलीच्या टॉप सिडेड जेनिक सिनेरने एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता सिनेर आणि हुबर्ट हुरकेझ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात सिनेरने झेंग झीजेनचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सिनेरने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा गेल्या जानेवारीत जिंकली होती. 2024 च्या टेनिस हंगामात त्याने 37 सामने जिंकले असून 3 सामने गमाविले आहेत. गतवर्षी सिनेरने विम्बल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पोलंडच्या पाचव्या मानांकित हुरकेझने जर्मनीच्या द्वितीय मानांकित अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.









