करण जौहरकडून निर्मित चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ची सध्या चर्चा होत आहे. निर्मात्यांनी आता चित्रपटाचे मोशन पोस्टर जारी केले आहे. शशांक खेतानकडून दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर आणि वरुण धवन ही जोडी दिसून येईल.
या दोघांनी यापूर्वी ‘बवाल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. यात दोघांमध्ये प्रथम प्रेम होते, मग प्रेमभंग होतो आणि यादरम्यान अनेक नाट्यामय घटना घडत असल्याचे यात दिसून येते. मोशन पोस्टरमध्ये जान्हवी आणि वरुण यांच्या भूमिकांचे अनेक कंगोरे दाखविण्यात आले आहेत. जान्हवीचा हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. याचा टीझरही प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आला आहे. जान्हवीचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. जान्हवीला दीर्घकाळापासून मोठ्या हिट चित्रपटाची प्रतीक्षा आहे. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपट तिची ही प्रतीक्षा पूर्ण करतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.









