ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir News) झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा (Terrorist) सुरक्षा बालाच्या जवानांनी खात्मा केला आहे. सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये पुलवामात (Pulwama Encounter) चकमक झाली. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. तर अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके ४७ रायफल, एक पिस्तूल आणि मोठ्या संख्येने दारुगोळ्या जप्त करण्यात आला आहे. जवानांकडून चकमक झालेल्या भागाचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे इरफान मलिक, फजिल नजीर भट्ट, जुनैद कादिर असून ते लष्कर- ए- तोयबा अतिरेकी संघटनेचे सदस्य होते. पंधरा दिवसांच्या आत जम्मू काश्मिरात जवानांनी पुलवामात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
सर्व अतिरेकी स्थानिक होते. या चकमकीत खात्मा करण्यात आलेल्या अतिरेकी इरफानचं वय २५ वर्ष होतं, तो पुलवामाच्या हरिपोरा इथला होता. तर फाजिल नजीर भट्टचं वय २१वर्ष होता. फालिलही पुलवामाचाच होत. तर पुलवामाच्या गुदौरच्या जुनैद कादिरचं वय अवघं १९ वर्ष होतं. या तिघांची चकमकीत खात्मा करण्यात आलाय. जम्मू काश्मीर पोलिसांनी या बाबतची माहिती दिलीय. हे सर्व अतिरेकी स्थानिक होतो. त्यांचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते, असंही काश्मीर पोलिसांनी म्हटलंय.