Sanjay Raut : आमच्या भावना जम्मू-काश्मीरशी आहेत. सरकारने मानवतेच्या नात्याने या पंडितांना भेट द्यावी. पीओके आणणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांनी आधी काश्मीरींना वाचवावं. भारत जोडो यात्रेसाठी जम्मूमध्ये आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. 2022 मध्ये 25 पेक्षा जास्त लोकांची हत्या करण्यात आली आहे. टार्गेट किलींगच्या मुद्यावरून गेले अडीचशे दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले काश्मिरमध्ये साडे चार हजार सरकारी कामगारांनी आंदोलन केले आहे. यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात काश्मिरी पंडितांना मान-सन्मान दिला. शाळा, कॉलेज, नोकरीत संधी दिली. मग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा का नाही करू शकत? भाजपा नेहमीच काश्मिरी पंडितांच्या मुद्दयावर राजकारण करत आलयं. हा राजकारण करण्याचा मुद्दा नाही. पंतप्रधानांनी प्राधान्यानं काश्मिरीच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं.तुम्ही पीओके गेले सात वर्षात केले नाही. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही पीओके घेऊन येतो असेही राऊत म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









