वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळविली जात आहे. न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज काईल जेमिसनला या मालिकेसाठी संघात निवडले गेले नाही. जेमिसनला स्नायू दुखापत झाली असून त्याला सातत्याने वेदना होत आहेत. दुखापती समस्येमुळे जेमिसनला या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय क्रिकेट न्यूझीलंडने घेतला आहे.
सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील उर्वरित सामन्यात जेमिसन खेळू शकणार नाही. या मालिकेतील पुढील सामना नेलसन येथे बुधवारी तर त्यांनतरचा सामना येत्या शनिवारी नेपियरमध्ये खेळविला जाईल.









