राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी 9 वर्षात काय केले असा प्रश्न विचारून त्यांनी फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष फोडले असल्याचे विधान केले आहे. तसेच जालन्यातील आंदोलकांवर कारण नसताना लाठीहल्ला झाला असून राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती गेली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांचे जिथे जंगी स्वागत करण्यात आले.
एका जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात काय केले ? त्यांनी राज्यामध्ये फक्त फोडाफोडीचे राजकारण केले आहे. तसेच सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवला जात आहे. माझे मोदी साहेबांना एकच म्हणणे आहे कि कोणी चुकीचे काम केले असेल तर त्याच्यावर खटला भरा… त्याला सजा द्या… आणि जर त्यांचे काहीच केले नसेल तर त्याची सजा तुम्ही काय घेणार ते जाहीर सभेत सांगा.” असा प्रश्न त्यांनी विचारला.
जालना लाठीहल्ल्या बाबत विधान करताना ते म्हणाले, “राज्याचा कारभार चुकिच्या लोकांच्या हाती आहे. जालनातील आंदोलकांवर कारण नसताना लाठीहल्ला झाला. महीलांवर तसेच आयाबहीणींवर हल्ला करण्यात आला. महिलांवर हल्ला करणारे सरकारला येत्या निवडणूकीला नक्कीच पराभूत करू” असा विश्वास त्यांनी आपल्या कार्य़कर्त्यांना बोलून दाखवला.