सांगली : प्रतिनिधी
जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी सांगली येथे सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलकांनी रस्त्यावर टायरी जाळत रस्ता आडवण्यात आला. तसेच दांडकं मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत अनेक आंदोलकांसह पोलीसही गंभिर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर सांगलीमध्येही याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलने करून मराठा समाज आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आज जतमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने विजापूर- गुहागर महामार्गावर रास्ता रोको करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
तर सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे ‘दांडकं मोर्चा’ काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
पलूस येथे विधानपरिषद आमदार अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली ‘एल्गार मोर्चा’ काढून राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
तर सांगली जिल्ह्यातील विटा- गार्डी येथे रस्त्यावर टायरी जाळून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षण देणार नसाल तर सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.








