लवकरच समुद्रात सामावणार मोठे शहर
जगात हवामान बदलाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे लोकांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे लोक बेहाल झाले आहेत. परंतु या हवामान बदलाचा मोठ्या शहरांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. न्यूयॉर्क, जकार्ता आणि मेक्सिको सिटी यासारखी शहरे लवकरच समुद्रात सामावली जाणार आहेत. या शहरांच्या किनाऱ्यावरील जलसतर वेगाने वाढत आहे. या शहरांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात येईल असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे जगातील सर्वात वेगाने बुडत जाणारे शहर आहे. मागील 25 वर्षांमध्ये हे शहर 16 फूट खचले आहे. जकार्तात भूजलाचा अत्याधिक वापर, दलदलयुक्त जमिनींवर उभारलेल्या इमारती आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हे शहर बुडणार आहे. शहर खचण्याच्या समस्यांवर उपाययोजना न करण्यात आल्यास 2050 पर्यंत शहराचे काही हिस्से पूर्णपणे पूरग्रस्त होऊ शकतो असे संशोधकांचे मानणे आहे.
मेक्सिको सिटी देखील खचत असून यामागे भूजलाचा वारेमाप उपसा हे कारण आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये देखील जमीन खचण्याची समस्या आहे. तेथे जमीन खचण्याचे प्रमाण 18.29 मिलिमीटर प्रतिवर्ष इतका आहे.









