वार्ताहर/जाकादेवी
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथील रहिवासी शशिकांत रामचंद्र कांबळे (मूळ गाव- खानू ता. रत्नागिरी) यांची कन्या सायली शशिकांत कांबळे या (20 वर्षीय) तरुणीने जाकादेवी येथील आपल्या घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जाकादेवी येथे शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली.
सायली शशिकांत कांबळे हिची एम.बी.बी.एस. करण्याची तीव्र इच्छा होती. मुलीच्या इच्छेनुसार तिच्या आई-वडिलांनी परदेशी मेडिकलला जाण्यासाठी शुक्रवारी मुंबईत जाऊन व्हीजाही काढला होता. मुंबईतून ती वडिलांसोबत शनिवारी सकाळी जाकादेवीत आली. घरातील नेहमीप्रमाणे तिने कामेही केली. आई व वडील घरी असताना आपल्या बेडरूममध्ये जावून तिने शनिवारी सायंकाळी 5.30 वा. गळफास लावून आत्महत्या केल्याचे दृष्टीस आले. या घटनेचा आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. सायली बालपणापासून हुशार होती. मेडिकल क्षेत्रात तिला आवड होती. सायली हिने नेमकी आत्महत्या का केली, या बाबत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्वाती राठोड, नम्रता राणे, उदय वाजे अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : तन्वी घाणेकरचे मागील ६ महिन्यांचे कॉल डिटेल्स तपासणार