बचाव पक्षाचा न्यायालयापुढे युक्तीवाद
रत्नागिरी प्रतिनिधी
जाकादेवी सेंट्रल बँक दरोडा खटल्यात बचाव पक्षाकडून युक्तीवाद करण्यात येत आह़े यावेळी बचाव पक्षातर्फे युक्तीवाद करताना ॲड. संकेत घाग यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी मृत संतोष चव्हाण याचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला होत़ा यावेळी पोलिसांकडून गुन्हा रजिस्टर नंबर नोंदवण्यात आल़ा असे असताना ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी 5 वाजता एफआयआर नोंदवण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा एफआयआर संशयास्पद असल्याचा युक्तीवाद ॲड. घाग यांनी केला.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े नुकताच सरकारी पक्षाच्यावतीने युक्तीवाद करण्यात आल्यानंतर आता आरोपींच्यावतीने युक्तीवाद न्यायालयापुढे करण्यात येत आह़े यावेळी ॲड़ घाग यांनी सांगितले की, गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश सावंत हा घटनेच्या एक दिवस आधी बँकेत येवून गेल्याचा दावा सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे करण्यात आला आह़े या व्यतिरिक्त प्रथमेश याच्याविरूद्ध कोणताही पुरावा सरकारी पक्ष न्यायालयापुढे सादर करू शकलेला नाह़ी तो अन्य आरोपींसोबत होता, त्याच्याकडून किती पैसे जप्त करण्यात आले. त्याच्याकडून कोणते हत्यार जप्त करण्यात आले, कटात त्यांचा सहभाग होता का, या बाबत एकही पुरावा सरकारी पक्ष न्यायालयापुढे सादर करू शकलेला नाही,असे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.
जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा धामणसे) गोळी घालून ठार केले होत़े तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होत़ा तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाल्याचा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आहे.
घटनेच्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला होता. यावेळी पंचाने बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे होते, हे सांगितलेले दिसून येत नाह़ी बँक व्यवस्थापक कविश्वर यांनी या प्रकरणी तकार दाखल केली होती.मात्र त्यांनी घटना बघितली होती, हे संशयास्पद आह़े मृत संतोष चव्हाण याचा मृतदेह कॅशरूमच्या दरवाजा बाहेर पडलेला होता,असे सरकार पक्षाने सांगितले. असे असताना पंचाच्या जबाबानुसार सहाय्यक बँक व्यवस्थापकाच्या केबीनमध्ये संतोष चव्हाण याचा मृतदेह पडलेला होता,असे सांगण्यात आल़े त्यामुळे दोन्ही दाव्यांमध्ये विसंगती असल्याचे दिसत आहे, असा युक्तीवाद ॲड. घाग यांनी केला.
या खटल्यात एकूण 35 साक्षीदारांनी आपला जबाब न्यायालयापुढे नोंदवला आहे. यातील 2 साक्षीदार हे सरकारी पक्षाला फितूर (फुटले) झाले आहेत.बँक दरोडा घटनेला आता 9 वर्ष उलटून गेली असली तरी हा खटला सत्र न्यायालयात अद्याप पलंबित राहिला आहे. विविध कारणांनी यापूर्वी या खटल्याच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले होते. पुढील काही महिन्यात या खटल्याचा निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. यापूर्वी झालेल्या युक्तीवादावेळी ॲड. शेट्ये यांनी गुरूवारी न्यायालयापुढे सांगितले की, बँक दरोड्यावेळी प्रतिभा शिंदे या बँकेत कॅशियर म्हणून काम करत होत्या. त्यांनी आपल्या साक्षीमध्ये 5 आरोपींना बँकेत प्रवेश करताना पाहिले होते.तसेच आरोपीने बँक मॅनेजर कवीश्वर यांच्या डोक्याला बंदूक लावून पैसे लुटले,असे त्यांनी पाहिल्याचे न्यायालयापुढे सांगितले यावरून बँक मॅनेजर कवीश्वर व कॅशियर शिंदे यांचा जबाब एकमेकांशी जुळत असल्याचे ॲड. शेट्ये यांनी न्यायालयापुढे सांगितले होते.